प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्यातील लिंगनूर येथे राहणाऱ्या वीरेंद्र कुंतीनाथ नाईक वय 30 या तरुणाने मंगळवारी सकाळी घराशेजारील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेहावर शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास वीरेंद्र नाईक याचा मृतदेह चिंचेच्या झाडाला लटकत असल्याचे काही ग्रामस्थांना दिसले. ग्रामस्थांनी नाईक याच्या कुटुंबीयांना याची माहिती दिली. घरापासून काही अंतरावर असलेल्या चिंचेच्या झाडाला विरेंद्र यांनी आत्महत्या केली असल्याचे समजतात त्यांच्या नातेवाईकांनी आक्रोश केला.
याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मयत व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वीरेंद्र यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.