मुंबई
हैदराबादमधील कंपनी लिखिता इन्फ्रास्ट्रक्चरला 200 कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे काम नुकतेच मिळाले आहे. सदरचे कंत्राट मिळाल्याच्या बातमीनंतर शेअर बाजारामध्ये कंपनीचा समभाग 9 टक्क्मयांनी वधारल्याचे दिसून आले. लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही हैदराबादमध्ये तेल आणि वायू वितरणात पाईपलाईन सुविधा पुरवणारी कंपनी आहे. सदरच्या कंपनीला 2021 च्या मार्च तिमाहीअखेर विविध तेल आणि वायू वितरण कंपन्यांनी 200 कोटी रुपयांच्या कामांचे कंत्राट दिले आहे. एर्नाकुलमजवळ पाईपलाईन घालण्यासाठी इंडियन ऑइल अदानी गॅस प्रायव्हेट लिमिटेडकडून 34 कोटींचे कंत्राट कंपनीला मिळाले असून एकंदर 200 कोटी रुपयांचे कंत्राट मिळवण्यात यश मिळवले आहे.