वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कतारमध्ये 27 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान लिजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्स क्रिकेट स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धेत विविध देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. विंडीजचा ख्रिस गेल, भारताचा इरफान पठाण, अफगाणचा असगर अफगाण, लंकेचा दिलहारा फर्नांडो आणि इंग्लंडचा माँटी पनेसर यांचा या स्पर्धेत समावेश राहणार आहे.
यापूर्वी म्हणजे गेल्या वषी लिजेंड्स लीग मास्टर्स क्रिकेट स्पर्धा पहिल्यांदा भरविण्यात आली होती आणि या स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. आता ही स्पर्धा दुसऱयांदा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. भारताच्या इरफान पठाणने गेल्या वषी या स्पर्धेत 225 धावा जमविल्या होत्या आणि त्याने सात सामन्यातून 11 गडी बाद केले होते. इंग्लंडच्या माँटी पनेसरने सात सामन्यातून 12 गडी बाद केले होते. गेल्या वषी या स्पर्धेत पनेसर आणि इरफान पठाण हे यशस्वी गोलंदाज ठरले होते. अलीकडेच कतारमध्ये फिफाची विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा मोठय़ा प्रमाणात यशस्वी करण्यात आली होती. आता याच शहरामध्ये क्रिकेटलाही शौकिनांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या स्पर्धेचे सीईओ रमण रहेजा यांनी सांगितले.