सारेगमप लिटिल चॅम्प्स हा रिअलिटी शो छोटय़ा पडद्यावर दाखल झाला आहे. या नव्या पर्वाची चर्चा सर्वत्र होती आणि आता ही प्रतीक्षा संपली.. मागील पर्वातील पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, आर्या आंबेकर, मुग्धा वैशंपायन, कार्तिकी गायकवाड आणि प्रथमेश लघाटे हे या पर्वात देखील प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत यात फक्त गाणारेच लिटिल चॅम्प्स नाही तर वादक मित्रांमध्ये देखील काही छोटे दोस्त प्रेक्षकांच्या भेटीस आले आहेत. हो, हे खरं आहे. लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वात 4 छोटे वादक मित्र साथ देताना दिसत आहेत. यात नाशिकचा जय गांगुर्डेचा समावेश आहे. त्याला अटल गौरव अलंकार मध्य प्रदेश सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. कोल्हापूरची तन्वी पाटील ही वयाच्या 8 वर्षांपासून वारणा बालवाद्य वृंदमध्ये आहे. तिला मेंडोलिन, जलतरंग हार्मोनियम,कीबोर्ड आणि व्हायोलिन वाद्य वाजवता येतात तर कोल्हापूरचाच सोहम जगताप हा प्रेक्षकांना संतूर वाजवताना पहायला मिळतोय.
संकलन – अनुराधा कदम