प्रत्येकीच्या मेक अप किटमध्ये लिपस्टिक असतेच. लिपस्टिकची खरेदी वाटते तितकी सोपी नसते. अनेक जणी ब्रँड आणि चलती असणार्या शेड्सची निवड करतात. मात्र तुम्ही तुमच्या चेहर्याला साजेशी लिपस्टिक निवडायला हवी. लिपस्टिक खरेदी करण्याच्या या काही टिप्स…
- त्वचेच्या रंगानुसार लिपस्टिकची शेड निवडा. गोर्या वर्णाच्या महिलांनी फिकट गुलाबी, कोरल, पीच तसंच न्यूड शेड्सच्या लिपस्टिकची निवड करायला हवी. गव्हाळ वर्णाच्या महिलांनी गुलाबी रंगातल्या शेड्स घ्यायला हव्यात तर सावळ्या वर्णाच्या महिलांवर गडद रंगाच्या लिपस्टिक शोभून दिसतील.
- लिपस्टिकचं बजेट ठरवून घ्या. उगाचच परदेशी ब्रँडची महागडी लिपस्टिक खरेदी करू नका. तुम्हाला कमी किंमतीत दर्जेदार लिपस्टिक मिळू शकते.
- कोणतीही लिपस्टिक साधारणपणे तीन वर्षं टिकते. लिपस्टिक खरेदी करताना तिची एक्सपायरी डेट तपासून घ्या. काही लिपस्टिक कमी काळ टिकतात. त्यामुळे अधिक काळ टिकणारी लिपस्टिक खरेदी करणं फायद्याचं ठरू शकतं.
- लिपस्टिकचे टेस्टिंग पॅक्स असतात. लिपस्टिकची शेड तुमच्या चेहर्यावर उठून दिसणार की नाही हे जाणून घेण्यासाठी या टेस्ट पॅकमधली लिपस्टिक मनगटावर लावू बघा. ऋ तू आणि कार्यक्रमानुसार लिपस्टिकची निवड करा. बाजारात क्रीम, ग्लॉसी, मॅटे अशा विविध प्रकारच्या लिपस्टिक्स उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हाला योग्य वाटणार्या लिपस्टिकची निवड करा.