ऑनलाईन टीम / कैरो :
लिबियाच्या समुद्रात स्थलांतरित मजुरांना घेऊन जाणारी बोट उलटून 74 जण बेपत्ता झाले आहेत. या बोटीतून 120 मजूर प्रवास करत होते. त्यामधील 46 जणांना वाचवण्यात प्रशासनाला यश आले.
संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतरितांसाठीच्या संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, लिबियाच्या राजधानीपासून 120 किलोमीटरवर असलेल्या खोमासजवळ ही दुर्घटना घडली. लिबियाच्या कोस्ट गार्ड आणि मच्छिमारांच्या मदतीने 46 जणांना वाचवण्यात यश आले. तर 74 जण बुडाले.
दरम्यान, भूमध्य समुद्रात 1 ऑक्टोंबरपासून बोटी बुडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबरपासून 8 बोटी भूमध्य समुद्रांमध्ये दुर्घटनाग्रस्त झाल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच स्थलांतरित मजुरांची बोट उलटून 19 जण बुडाले होते.