प्रतिनिधी / वास्को
वास्कोतील रहिवासी व विशेष मुलांना शिकवणाऱया शिक्षिका मारिया लिबरेटा (लिबी) मेंडोन्सा यांना राष्ट्रीय बाल व महिला विकास परिषद (एनसीडब्ल्युडीसी)तर्फे त्यांच्या सामाजीक कामाबद्दल आंतरराष्ट्रीय प्रेरणादायी पुरस्कार प्राप्त झाला आहे.
लिबी मेंडोन्सा यांना एनसीडब्ल्यूडीसी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. बिरेन देव यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. मेंडोन्सा या मडगावमधील गुजराती समाज ट्रस्टच्या विशेष मुलांच्या शाळेत शिक्षिका आहेत. तसेच त्या अपंग लोकांच्या उन्नतीठी कार्य करतात. मेंडोन्सा यांना अलिकडेच बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.