आदित्य खिलारी मालिकावीर, आशुतोष एच. सामनावीर
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हुबळी येथे क्रिकेट कोचिंग सेंटर आयोजित लीलावती पॅलेस चषक 14 वर्षाखालील आंतरक्लब क्रिकेट क्लबच्या अंतिम सामन्यात बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने हुबळी क्रिकेट अकादमी संघाचा 10 गडय़ाने पराभव करून लिलावती पॅलेस चषक पटकाविला. आदित्य खिलारेला मालिकावीर, आशुतोष एच. याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
हुबळी येथे झालेल्या या सामन्यात हुबळी अकादमीने 30 षटकात 8 बाद 114 धावा केल्या. त्यात गणेश बी ने 4 चौकारासह 42, आदित्य एन. के. ने 19, आरवने 3 चौकारासह 18 धावा केल्या. बेळगाव स्पोर्ट्स क्लबतर्फे गोलंदाजी करताना अथर्व डी, तेजस जी. के., उत्कर्श पी. एस. यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल बेळगाव स्पोर्ट्स क्लब संघाने 20 षटकात बिनबाद 115 धावा करून सामना 10 गडय़ांनी जिंकला. त्या आशुतोष एच. ने 12 चौकारासह नाबाद 70 तर सुचित आर. एस. ने 2 चौकारासह नाबाद 32 धावा केल्या. प्रमुख पाहुणे संतोष शेट्टी, संदेश पटेल, शशिकांत बैलप्पण्णावर, यांच्याहस्ते विजेत्या बेळगाव स्पोर्ट्स क्लबला व उपविजेत्या हुबळी स्पोर्ट्स अकादमीला चषक व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
अंतिम सामन्यातील सामनावीर आशुतोष एच. उत्कृष्ट फलंदाज भावीन बसडोनी, उत्कृष्ट गोलंदाज हित पटेल, प्रॉमिसिंग खेळाडू आशुतोष हिरेमठ, मालिकावीर आदित्य खिलारे यांना चषक देऊन गौरविण्यात आले.