वृत्तसंस्था /लंडन
युफा चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील बुधवारी झालेल्या सामन्यात लिव्हरपूल संघाने ऍटलेटिको माद्रिदचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया एका सामन्यात मँचेस्टर सिटीने ब्रुगे क्लबवर मात केली.
लिव्हरपूल आणि ऍटलेटिको माद्रीद यांच्यातील सामन्यात लिव्हरपूल संघातर्फे दियागो जोटा आणि सादिओ मॅने यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयामुळे या स्पर्धेच्या गुणतक्त्यात ब गटात लिव्हरपूलने चार च्सामन्यांतून 12 गुण घेत आघाडीचे स्थान मिळविले आहे. अन्य एका सामन्यात मँचेस्टर सिटीने ब्रुगे क्लबचा 4-1 असा पराभव केला. ऍजेक्सने बोरूसिया डॉर्टमंडचा 3-1 असा पराभव करत पूर्ण गुण मिळविले.