वृत्तसंस्था/ लंडन
चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील दुसऱया फेरीतील लिव्हरपूलचा सामना जर्मनीत खेळविला जाणार आहे. दरम्यान कोरोना महामारी समस्येमुळे जर्मनीच्या शासनाने ब्रिटनमधून येणाऱया सर्व नागरिकांवर 17 फेब्रुवारीपर्यंत प्रवेश बंदी केली आहे. या निर्णयामुळे लिव्हरपूल संघाला चॅम्पियन्स लीग स्पर्धेसाठी जर्मनीत प्रवेश करता येणार नाही. लिव्हरपूलचा संघ या सामन्यासाठी पर्यायी ठिकाणाचा शोध घेत आहे.
चॅम्पियन्स लीग स्पर्धेत पहिल्या टप्प्यातील शेवटच्या 16 संघामध्ये स्थान मिळविण्यासाठी लिव्हरपूल आणि आरबी लीपझिग यांच्यात 16 फेब्रुवारीला सामना खेळविला जाणार होता. पण आता या सामन्यासाठी दुसऱया ठिकाणाची निवड करावी लागेल.