वृत्तसंस्था / मँचेस्टर
इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत खेळणाऱया लँकेशायर क्रिकेट क्लबने इंग्लंडचा 28 वर्षीय फलंदाज लियाम लिंव्हिगस्टोनच्या करारात वाढ करण्याचा निर्णय जाहीर केला. लँकेशायर क्रिकेट क्लबने लिंव्हिगस्टोनबरोबरचा नवा करार 2024 अखेरपर्यंत वाढवला आहे.
लिंव्हिस्टोनने 2015 साली लँकेशायर क्रिकेट क्लबमध्ये आपले पदार्पण करताना आपल्या संघाला आक्रमक फलंदाजीच्या जोरावर विजय मिळवून दिला होता. लिव्हिंगस्टोन क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात खेळत आहे. लँकेशायर क्रिकेट अकादमीचा ग्रॅज्युएट लिंव्हिगस्टोनने 163 सामन्यांत लँकेशायर क्लबचे प्रतिनिधीत्व केले आहे. टी-20 प्रकारात लिंव्हिगस्टोन हा जगातील एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो.