प्रतिनिधी / कोल्हापूर
कळंबा, साळोखे पार्क येथे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱया युवक आणि युवतीमध्ये विवाह करण्यावरुन शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातून युवकाने संबंधीत युवतीला मारहाण करुन, तिला जबरदस्तीने विष पाजल्याने तिला अत्यावस्थेत शहरातील एका खासगी हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. या घडल्या घटनेची पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
या घटनेपासून संबंधीत युवतीच्या मित्र सोहम अनिल माथुरे (रा. बोणे मळा, इचलकरंजी) याने पलायन केले असून, पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. विष प्रयोग करण्यात आलेली पिडीत युवती तब्बल 13 दिवस मृत्युशी झुंज देत होती. ती गुरुवारी रात्री शुध्दीवर आल्यानंतर हा घडला प्रकार समोर आला.
पिडीत युवती टायपिस्ट म्हणून शहरात खासगी नोकरी करीत आहे. याचदरम्यान तिची आणि संशयीत आरोपी सोहम माथुरे याची ओळख झाली. या ओळखीतून हे दोघे कळंबा येथील साळोखे पार्कमध्ये गेली चार वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहु लागले. या दोघांच्यामध्ये सोमवारी (दि.13) लग्न करण्यावरुन शाब्दीक बाचाबाची झाली. त्यातून सोहमने पिडीत युवतीला बेदम मारहाण करुन तिला जबरदस्तीने किटकशानक पाजले. ती बेशुध्द पडल्याने त्याने घटनास्थळावरुन पलायन केले. या घडल्या घटनेची माहिती पिडीतेच्या नातेवाईकांना समजताच त्यांनी तिला उपचारासांक्ष शहरातील एका खासगी हॉस्पीटलध्ये दाखल केले आहे.