52 दशलक्ष डॉलर्सचा उभारला निधी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
बेंगळूरची लिसियस ही कंपनी युनिकॉर्न क्लबमध्ये नुकतीच समाविष्ट झाली आहे. युनिकॉर्न क्लबच्या यादीमध्ये 2021 मध्ये सामील होणारी ही तिसावी कंपनी आहे.
सदरच्या कंपनीने 52 दशलक्ष डॉलर्सचा निधी नुकताच उभारला होता. त्यानंतर या कंपनीचे मूल्य 1 अब्ज डॉलर्सने वाढल्याचे दिसले. भारतासह इतर देशांमध्ये आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याची योजना कंपनीची असून त्याकरिता कंपनीने नियोजन केले आहे. ताजे मांस आणि समुद्री खाद्यपदार्थाच्या व्यवसायामध्ये ही कंपनी कार्यरत आहे. ऑनलाइन व इतर मार्गाने सदरच्या वस्तु कंपनी विक्री करते. ताज्या भांडवलाच्या जोरावर कंपनी येणाऱया काळात आपल्या व्यवसायाला अधिक गती देईल.