वृत्त संस्था/ लंडन
अफगाणचा 21 वर्षीय वेगवान गोलंदाज नवीन उल हकशी इंग्लिश कौंटी क्रिकेट स्पर्धेत सहभागी होत असलेल्या लिसेस्टरशायर क्रिकेट क्लबने आगामी टी-20 क्रिकेट हंगामासाठी नवा करार केला आहे.
टी-20 प्रकारात नवीन उल हकच्या कामगिरीत सातत्य असल्याचे मत या क्लबचे प्रमुख प्रशिक्षक पॉल निक्सन यांनी नोंदवले. अफगाणचा 21 वर्षीय नवीन उल हक याला क्रिकेटचा फारसा अनुभव नाही. पण अफगाण संघाचे त्याने वनडे क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केले असून त्याने सीपीएल, एलपीएल, अबु धाबी टी-10 स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. टी-20 प्रकारात त्याने 23.47 धावांच्या सरासरीने 55 बळीं नोंदविले आहेत. लिसेस्टरशायर संघाने 2004, 2006 आणि 2011 साली असे तीनवेळा राष्ट्रीय टी-20 क्रिकेट स्पर्धा जिंकली आहे. 2021 च्या टी-20 स्पर्धेला 9 जूनपासून इंग्लंडमध्ये प्रारंभ होत आहे