लंडन / वृत्तसंस्था
येथील किंग पॉवर स्टेडियमवर झालेल्या इंग्लिश प्रीमियर लीग स्पर्धेतील साखळी सामन्यात लिसेस्टर सिटीने लिव्हरपूलला 1-0 फरकाने पराभवाचा धक्का दिला. ऍदेमोला लूकमनने 59 व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.
इंग्लिश प्रीमियर लीग गुणतालिकेत लिव्हरपूलचा संघ सध्या 41 गुणांसह दुसऱया स्थानी विराजमान आहे. मँचेस्टर सिटीचा संघ लिव्हरपूलपेक्षा 6 गुणांनी आघाडीवर आहे. दुसरीकडे, लिसेस्टरचा संघ 9 व्या स्थानी आहे.
या स्पर्धेतील अन्य साखळी सामन्यात टॉटनहम हॉटस्परने साऊदम्प्टनविरुद्ध 1-1 अशी बरोबरी प्राप्त केली. हॉटस्परचा संघ सध्या सहाव्या स्थानी आहे. अन्य लढतीत क्रिस्टल पॅलेसने नॉर्विच सिटीला 3-0 तर वेस्ट हॅम युनायटेडने वॅटफोर्डला 4-1 अशा फरकाने नमवले. स्थानिक प्रमाणवेळेनुसार रात्री उशिराने चेल्सी-ब्रिटॉन यांची लढत होणे अपेक्षित होते.