अदानीचे स्थान सर्वोच्च पातळीवर -मागील वर्षभरातील स्थिती
वृत्तसंस्था / मुंबई
मागील वर्षभरात शेअर बाजारात विविध कंपन्यांच्या बाजार भांडवलाची नोंद करण्यात आली आहे. गॅस कंपन्यांच्या भांडवलाच्या आकडेवारीचा यामध्ये समावेश राहिला आहे. अदानी टोटल गॅस या कंपनीचे एकूण बाजार भांडवल शुक्रवारी 1.81 लाख कोटीवर पोहचले आहे.
याच दरम्यान बाजारातील लिस्टेट सर्व गॅस कंपन्यांचे बाजार भांडवल 40 हजार कोटी रुपये कमी राहिले आहे. या कंपन्यांचे साधारण बाजार भांडवल 1.41 लाख कोटी रुपये आहे. 1 वर्षात अदानी टोटल गॅसचे समभाग हे 13 पटीने वाढल्याने गुंतवणूकदारांना याचा फायदा उठवता आला आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार अदानी टोटल गॅसचे समभाग मागील चार दिवसांमध्ये 30 टक्क्यांनी वाढले आहेत. समभाग एका महिन्यात 1180 रुपयांवरून वाढून 1680 रुपयावर राहिला आहे. ज्यामध्ये एक वर्षात ही वाढ 125 रुपयानी नोंदली असून आज 1680 रुपयांपर्यंत कामगिरी करत आहे. एका महिन्यामध्ये याच्या समभागानी जवळपास 50 टक्क्यांचा फायदा गुंतवणूकदारांना करुन दिला आहे.
महानगर गॅसचे बाजारमूल्य
याच दरम्यान लिस्टेट गॅस कंपन्यांमध्ये महानगर गॅस लिमिटेडचे बाजार भांडवल 11,642 कोटी रुपये राहिले आहे. शुक्रवारी जीएसपीएलचे बाजार भांडवल 17 हजार कोटी रुपयावर होते. पेट्रोनेट एलएनजीचे बाजार भांडवल 36 हजार 750 कोटी रुपयावर राहिले आहे. इंद्रप्रस्थ गॅसचे बाजार भांडवल 36428 कोटी रुपये होते.