मुंबई
भारतीय शेअर बाजारात बीएसईतील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल पहिल्यांदाच 3 हजार अब्ज डॉलर्सवर पोहचलं आहे. दोन दशकापेक्षाही कमी कालावधीत सदरची कामगिरी नोंदवण्यात आली आहे. सोमवारी सरतेशेवटी बीएसईमधील सूचीबद्ध कंपन्यांनी बाजार भांडवल 3 हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. 16 डिसेंबर 2020 मध्ये बाजार भांडवल 2500 अब्ज डॉलर्स इतके होते. सोमवारी 159 दिवसातच 3 हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठण्यात सूचीबद्ध कंपन्या यशस्वी झाल्या आहेत.