182 लाख कोटींनी वाढले : जानेवारीपर्यंत 200 लाख कोटींवर जाण्याचे संकेत
वृत्तसंस्था / मुंबई
शेअर बाजारामध्ये सलगची वाढत असणारी विदेशी गुंतवणूक आणि देशातील गुंतवणूकदारांच्या वाढत जाणाऱया संख्येवर प्रमुख निर्देशांक मात्र विक्रमी कामगिरीची नोंद दिवसागणिक करत असल्याचे पहावयास मिळत आहे. यामध्ये सेन्सेक्स 47 हजारचा टप्पा पार करत आणि निफ्टी 14 हजारच्या जवळपास आपली झेप ठेवत व्यवहार सुरु असल्याचे पहावयास मिळत आहे.
सकारात्मक कामगिरीसोबत बीएसईमधील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य हे 188 लाख कोटी रुपयांच्या घरात पोहोचले आहे. विशेष बाब म्हणजे जास्तीत जास्त ब्रोकरेज हाऊसेस बाजाराची गती पुढे सुरु राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करत आहेत. यामध्ये अधिकची अपेक्षा आहे, ती पुढील वर्षातील प्रारंभीच्या महिन्यात सेन्सेक्स 50 हजारचा टप्पा पार करुन पुढे कार्यरत राहणार असल्याचेही संकेत व्यक्त केले जात आहेत.
20 वर्षांतील बाजारातील विक्रमी वाढ
बीएसई एक्सचेंजवर उपलब्ध असणाऱया माहितीनुसार 20 वर्षं 4 महिन्यात लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 182 लाख कोटी रुपयांपेक्षा अधिकने वाढले आहे. ऑगस्ट 2001 मध्ये हा आकडा 5.23 लाख कोटी रुपयांवर राहिला होता, जो डिसेंबर 2020 मधील आतापर्यंत 187.20 लाख कोटी रुपये झाला आहे. याचदरम्यान सेन्सेक्स निर्देशांकानेही समाधानकारक कामगिरी केली आहे.
भविष्यातही तेजीचे संकेत
जागतिक पातळीवरील ग्लोबल ब्रोकरेज हाऊस जेपी मॉर्गन यांच्या माहितीनुसार 2021 मध्ये डिसेंबरपर्यंत निफ्टी 15 हजारचा टप्पा गाठण्यास यशस्वी होणार असल्याची माहिती आहे. या अगोदर बीएनपी परिबास यांनी आपल्या अहवालात म्हटले आहे,की वर्ष 2021 मध्ये सेन्सेक्स 50,500 च्या विक्रमी पातळीवर जाण्याचे संकेत आहेत. मॉर्गन ऍण्ड स्टॅनली यांनीही सेन्सेक्स 50 हजारचा आकडा ओलांडेल असं म्हटलं आहे.
20 वर्षांतील लिस्टेड कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य 182 लाख कोटींनी वाढले
महिना | बंदची स्थिती | बाजारमूल्य (रुपये) |
---|---|---|
डिसेंबर 2020 | 47,353.75 | 187.02 लाख कोटी |
नोव्हेंबर 2020 | 44,149.72 | 174.14 लाख कोटी |
ऑगस्ट 2018 | 38,645.07 | 159.34 लाख कोटी |
नोव्हेंबर 2017 | 33,149.35 | 145.96 लाख कोटी |
मार्च 2017 | 29,620 | 121.54 लाख कोटी |
जुलै 2016 | 28,051.86 | 108.63 लाख कोटी |
जून 2014 | 25,413.78 | 90.20 लाख कोटी |
एप्रिल 2014 | 22,417.80 | 74.94 लाख कोटी |
डिसेंबर 2009 | 17,464.81 | 60.81 लाख कोटी |
जुलै 2007 | 15,550.99 | 45.29 लाख कोटी |
मार्च 2006 | 11,279.96 | 30.22 लाख कोटी |
मार्च 2004 | 5,590.60 | 15.39 लाख कोटी |
ऑगस्ट 2001 | 3,244.95 | 5.23 लाख कोटी |