वृत्तसंस्था/ माद्रीद
क्रोएशियाचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू लुका मोड्रीकच्या रियल माद्रीद क्लबबरोबरच्या करारात वाढ करण्यात आली आहे. या करारानुसार आता मोड्रीक 2022 जूनपर्यंत रियल माद्रीद संघाचे प्रतिनिधीत्व करेल.
रियल माद्रीद क्लबबरोबर यापूर्वी मोड्रीकने केलेला करार पुढील महिन्यात संपणार होता. पण रियल माद्रीदचे अध्यक्ष पेरेझ यांनी मोड्रीकच्या करारात वाढ करण्याचा निर्णय घेतला. 2012 साली मोड्रीकबरोबर रियल माद्रीदने पहिल्यांदा करार केला होता.