सध्या सणासुदीचे दिवस आहेत. या दिवसात छान नटण्यामुरडण्याची संधी मिळते. पारंपरिक कपडे घातले जातात. साडी, सलवार कमीझ, लाँग कुर्ता नेहमीच घातला जातो. यासोबतच तुम्ही शॉर्ट कुर्ती कॅरी करू शकता. शॉर्ट कुर्ती व्हर्सटाईल आहे. ती वेगवेगळ्या पद्धतींनी घालता येतो. फ्युजन लूकसाठी तुम्ही शॉर्ट कुर्ती कॅरी करू शकता. शॉर्ट कुर्ती कॅरी करण्याच्या या काही खास टिप्स…
- शॉर्ट कुर्ती आणि शरारा हे कॉम्बिनेशन खूपच हटके दिसतं. फेस्टिव लूक मिळवण्यासाठी हा पेहराव कॅरी करायला काहीच हरकत नाही. यामुळे तुम्हाला एथनिक लूक मिळेल. या पेहरावावर छानसे स्टेटमेंट कानातले शोभून दिसतील.
- फ्रॉक स्टाईल शॉर्ट कुर्ती ड्रेस म्हणूनही कॅरी करता येईल. कॅज्युअल लूकसाठी अशा पद्धतीची युक्ती लढवायला काहीच हरकत नाही. शॉर्ट कुर्तीवर तुम्ही स्नीकर्स घालू शकता. यामुळे तुम्हाला स्पोर्टी लूक मिळू शकतो.
- लेअरिंगचा फंडा वापरूनही शॉर्ट कुर्तीचा वापर करता येईल. समजा तुम्ही प्लेन इव्हिनिंग गाउन घातला असेल तर त्यावर डिझायनर शॉर्ट कुर्ती कॅरी करता येईल. अर्थात इव्हिनिंग गाउनवर जॅकेट स्टाईल किंवा डिप नेक कुर्ती कॅरी करा.
- शॉर्ट कुर्ती कॅरी करण्याची एक चांगली पद्धत म्हणजे जीन्स विथ शॉर्ट कुर्ती. जीन्सवर शॉर्ट कुर्ती खूप शोभून दिसेल. ऑफिसमध्ये किंवा अगदी भटकंतीला जातानाही तुम्ही हा पेहराव कॅरी करू शकता. कॅरी करू शकता.
- शॉर्ट कुर्ती विथ धोती पँट हा पर्यायही चांगला आहे. सणासुदीला फ्युजन लूक मिळवण्यासाठी तुम्ही हा पेहराव करू शकता. ए लाईन किंवा पेपलम तसंच फ्रॉक स्टाईल शॉर्ट कुर्तीही तुम्ही कॅरी करू शकता. कलर ब्लॉकिंग, मोनोक्रोमेटिक अशा पद्धतीच्या स्टाईल्स करता येतील.