वृत्तसंस्था/ इस्टबोर्न
डब्ल्यूटीए टूरवरील येथे शनिवारी झालेल्या इस्टबोर्न महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत लॅटव्हियाच्या एलेना ओस्टापेंकोने एकेरीचे जेतेपद मिळविताना ब्रिटनच्या कोंटाव्हेटचा पराभव केला.
शनिवारी झालेल्या महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ओस्टापेंकोने कोंटाव्हेटचा 6-3, 6-3 अशा सेट्समध्ये पराभव केला. गेल्या दोन वर्षांच्या कालावधीतील ओस्टापेंकोचे हे पहिले विजेतेपद आहे.