प्रतिनिधी/ बेळगाव
किल्ला तलाव येथील लेकक्हय़ू हॉस्पिटलमध्ये बुधवारी डॉक्टर्स डे चे आयोजन करण्यात आले होते. हॉस्पिटलमधील ज्ये÷ डॉक्टरांचा यावेळी सत्कार करण्यात आला. कोरोनाच्या काळातही जीवावर बेतून रुग्ण सेवा केलेल्या डॉक्टरांचा यावेळी सत्कार झाला.
डॉ. के. एस. माने, डॉ. मल्लिकार्जुन, डॉ. राहुल देसाई, डॉ. विनायक कुलगोड, डॉ. रवी पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. माने म्हणाले सध्या कोरोना या महामारीने संपूर्ण जगभर हाहाकार माजविला आहे. यामुळे घराबाहेर पडणे देखील कठिण झाले आहे. या काळातही डॉक्टरांनी आपली सेवा बजाविली आहे. त्यामुळे यावेळचा डॉक्टर्स डे विशेष असल्याचे त्यांनी सांगितले.