अचानक घडलेला प्रसंग आणि तिचा लढयामुळे वाचले कुटुंबाचे प्राण
प्रतिनिधी/ सातारा
रात्री पावणे बाराची वेळ रविवार पेठेत राहत असलेले वकील दाम्पत्य गोरे आपल्या कुटुंबासमवेत शिखर शिंगणापूर वरून त्यांच्या चारचाकी गाडीने सातारच्या दिशेने येत हेते. यावेळी पुसेगावच्या हद्दीत आल्यावर पाणी आणण्यासाठी उतरलेले वकील पती महेश व त्यांचे दाजी यांनी गाडी सुरू ठेवली. यांचा फायदा घेत संशयिताने याने गाडी वेगाने नेत जयश्री यांच्याशी झटापट केली. या झटापटीत चार महिन्यांचे बाळ खाली पडले. मागच्या सीटवर दोन्ही मुली बसल्या होत्या. अशा भयानक परिस्थितीत स्वतःच्या जीवाची परवा न करता आपल्या कुटुंबाचे रक्षण झाले पाहिजे. असा एकच निश्चय करून जयश्री यांनी ढाल बनून संशयिताचा सामना केला.
वकील महिला जयश्री महेश गोरे(वय 35, रा. रविवार पेठ सातारा) या चार महिन्याच्या बाळाला स्तनपान करत असल्याने त्यांना तहान लागली होती. दहिवडीपासून पुसेगाव पर्यंत एकही दुकान उघडे नव्हते. यामुळे पुसेगावात आल्यावर वकील पती महेश मोरे यांनी चौकात गाडी थांबवली. या चौकात सीसीटीव्ही होते. काही मुले आईस्क्रिम खात होती. अशा ठिकाणी गाडी थांबली होती.
तिथेच 50 मीटर च्या अंतरावर पान टपरी होती. गाडीत महेश यांचे दाजी उत्तम होळ ही होते. दोघेही खाली उतरले. आणि पान टपरीवर गेले. हे पाहून संशयित अभिजीत फडतरे(वय 31, रा. पो. फडतरवाडी ता. खटाव) हा गाडीच्या जवळ आला. त्याने गाडीत पाहिले. तेव्हा जयश्री आपल्या चार महिन्यांच्या बाळासोबत बसल्या होत्या. यावेळी त्यांची 7 वर्षाची मुलगी व 17 वर्षाची भाची पाठीमागील सीटवर बसल्या होत्या. गाडीत फक्त महिला आहेत. हे पाहून अभिजीत थेट गाडीत जावून बसला आणि हॅन्ड बेक काढून त्याने गाडी सुरू करत वेगाने गाडी चालवली. ही बाब जयश्री यांच्या लक्षात येताच त्यांना हॅन्डबेक ओढला आणि गाडी थांबवण्याचा प्रयत्न केला.
पण अभिजीत याने शिवीगाळ करत पुन्हा झटापट करून गाडी त्याच वेगाने पुढे नेली. या अभिजीतने गाडी थांबवावी म्हणून जयश्री यांनी लाथा बुक्क्यांनी त्याला मारहाण करायला सुरूवात केली. त्याला क्षणभरही पुन्हा हल्ला करण्याची संधी मिळाली नाही. इतक्यात महेश व त्यांचे दाजी हे पुन्हा गाडीजवळ आले. तर गाडी पार्किग केलेल्या ठिकाणी नव्हती. त्यांनी जवळ उभे असणाऱया मुलांना विचारले. तर गाडी एक इसम वेगाने घेवून गेल्याचे सांगितले. त्यांनी मुलांच्या मोटर सायकल वरून बसून गाडीचा पाठलाग केला. तोपर्यंत पुसेगाव हद्दीतील नदीच्या किनाऱयावर पोहचली. यावेळी जयश्री यांनी जोरात स्टेअरिंग वर लाथ मारल्याने गाडी यु-टर्न घेवून जागीच बंद पडली. तरीही जयश्री यांनी त्याला मारहाण करण्याचे बंद केले नव्हते. तोच अभिजीत याने गाडीचे दार उघडून पळ काढला. तो पर्यत महेश व दाजी उत्तम हे तिथे पोहचले. त्यांनी क्षणाची ही विलंब न लावता पुसेगाव पोलीस ठाण्यात जावून घडलेला प्रकार सांगितला. तोच उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदिप शितोळे यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हा दाखल केला. आणि घटनास्थळी जावून पंचनामा केला. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले. तसेच परिसर पिंजून काढला. यावेळी अभिजीत हा दहिवडी रोडला महालक्ष्मी हॉटेलच्या आडोश्याला लपून बसल्याची माहिती मिळताच त्याला अटक केली. अपहरण करून खून करण्याच्या प्रयत्न करणाऱया संशयित अभिजीतला अवघ्या तीन तासात शोधून काढण्यात पुसेगाव पोलीसांना यश आले.
बाळ हॅन्डबेकच्या मध्ये पडले…
संशयित फडतरेने गाडी थांबवावी म्हणून जयश्री त्याला हाताने लाथाबुक्क्यांनी मारत होत्या. यावेळी चार महिन्यांचे बाळ त्यांच्या हातातून सुटून हॅन्डबेकच्या मध्ये पडले. ही बाब मागे बसलेल्या भाचीच्या लक्षात येताच तिने बाळाला उचलून घेतले. तोच जयश्री यांनी स्टेअरिंगवर लाथ मारली आणि गाडी यु र्टन ने वळली. तोच फडतरे यांने जयश्री यांचा गळा काखेत धरून दाबण्याचा प्रयत्न केला. जयश्री यांनी कोपरा मारून स्वतःची सुटका केली. याच वेळी भाचीने ही त्याला पाठीमागून पकडले. त्याने झटापट करून गाडीचे दार उघडून पळ काढला.