प्रतिनिधी/ बेळगाव
ट्रक्टरमध्ये सापडून कंबर आणि मांडी यांना जबर दुखापत झालेल्या एका 13 वषीय मुलावर लेकव्हय़ू हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून त्याला जीवदान दिले. मुधोळच्या अक्कीमरडी येथील या मुलाला ट्रक्टरमुळे जबर दुखापत झाली आणि त्याचा जीव धोक्मयात आला होता.
त्याला लेकव्हय़ू हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर त्याच्या जीवनाबरोबरच त्याचा पाय वाचविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. महेशच्या उजव्या पायातील संवेदना कमी झाल्या होत्या. शिवाय अंतर्गत बरीच जखम होती.
हॉस्पिटलचे ज्ये÷ कार्डियाक सर्जन डॉ. के. एम. कट्टीमनी, ऑर्थो आणि स्पाईन सर्जन डॉ. श्रीशैल हणगंदी, भूलतज्ञ डॉ. प्रशांत आणि डॉ. वीरण्णा या सर्वांनी एकूण 6 तास प्रयत्न करून त्या मुलावर शस्त्रक्रिया केली. 15 दिवसानंतर त्याला घरी पाठविण्यात आले. सध्या त्याचा पाय हालचाल करू शकत असून, चार आठवडय़ामध्ये तो चालू शकेल, असे लेकव्हय़ूचे कार्यकारी संचालक व सीईओ डॉ. शशीकांत कुलगोड यांनी सांगितले.