पारस, पेटीएम आयपीओंना टाकले मागे – गुंतवणूकदारांचा वाढता विश्वास
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारात आयपीओमध्ये नवा इतिहास रचला गेला आहे. डाटा ऍनालिटीक्स क्षेत्रातील कंपनी लेटेंट व्ह्य़ुव्ह ऍनालिटीक्सच्या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. कंपनीचा आयपीओ सर्वाधिक 338 पट सबस्क्रीप्शन झाला आहे. गुंतवणूकदारांचा सर्वाधिक प्रतिसाद लेटेंट व्ह्य़ुव्हला लाभला आहे.
यासोबत कंपनीने पारस डिफेन्स, पेटीएमसारख्या मोठय़ा कंपन्यांच्या आयपीओंनाही मागे टाकले असल्याचे सांगण्यात येते. गुंतवणूकदारांचा विश् वास प्राप्त करण्यात कंपनीला मोठे यश आले आहे. कंपनी शेअर बाजारात लिस्टेड झाल्यानंतर प्रति समभाग 300 रुपयांचा लाभ होणार असल्याचे सांगितले जाते.
सदरच्या आयपीओसाठी 338 गुंतवणूकदारांनी रस दाखवला. आयपीओअंतर्गत समभागाचा भाव 190-197 रुपये असणार आहे. एका आयपीओत 76 समभागांचा लॉट असतो. एका लॉटची किंमत अंदाजे 15 हजार रुपये होती. कंपनी यायोगे 600 कोटी रुपये उभारणार असल्याचे समजते.
पारस डिफेन्सचा विक्रम मागे
असं पहिल्यांदा झालंय की दोन कंपन्यांच्या इश्युंना 300 पट प्रतिसाद मिळाला आहे. याआधी पारस डिफेन्स अँड स्पेस टेक्नॉलॉजीच्या आयपीओला 304 पट प्रतिसाद मिळाला होता. तर पारस शेअर बाजारात लिस्टींग झाल्यावर त्याचदिवशी पारसचा समभाग तीन पट वाढला होता. गुंतवणूकदारांनाही यातून उत्तम परतावा प्राप्त करता आला.