नवी दिल्ली
लेदर निर्यात परिषद (सीएलई) यांच्याकडून संजय लीखा यांची परिषदेच्या अध्यक्ष आणि राजेंद्र जालान यांची उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. लीखा अल्पाइन समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. सदरची संघटना वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असते. देशातील लेदर उद्योगामध्ये जवळपास 10 लाख लोक काम करत आहेत. जागतिक लेदर निर्यात आणि आयातीमध्ये भारताचा हिस्सा जवळपास तीन टक्के आहे.