लेनोवोचा टू-इन-वन लॅपटॉप बाजारात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील प्रसिद्ध इलेक्ट्रॉनिक कंपनी लेनोवोने भारतीय बाजारात आपला नवीन टू-इन-वन लॅपटॉप योगा 6 सादर केला आहे. सदर लॅपटॉपची स्क्रीन ही 360 डिग्रीपर्यंत फिरणारी आहे. सदरचे मॉडेल हे स्टाईल सपोर्टसोबत येत आहे. विशेष बाब म्हणजे या लॅपटॉपमध्ये कपडय़ाचा वापर केला असून टचस्क्रीन डिस्प्ले दिलेला आहे.
योगाची किमत
सदर लॅपटॉपला 121, 690 रुपये किमतीच्या टॅगसोबत सादर केला आहे. परंतु प्रमोशन ऑफरसोबत आता हा 86,990 रुपयामध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच एक बँकपॅक आणि ब्लॅटय़ूथ माऊसही मोफत मिळणार आहे.
योगामधील विशेष सुविधा
? योगा लॅपटॉपचा 13.6 इंचाचा एफएचडी टच आयपीएस एलसीडी डिस्प्ले
? रिझोल्यूशन 1920 ते 1080 पिक्सल
? एएमडी रायझेन 74700यू प्रोसेसर, 16 जीबी रॅम व 512 जीबी स्टोरेज
? सुरक्षेसाठी फिंगप्रिंट स्कॅनर दिलेला आहे
? 60 डब्लूएचआर क्षमतेची बॅटरी मिळणार
? ब्लूटय़ूथ 5.0, वायफाय6, ए युएसबी 3.2 टाइप-ए पोर्ट