नवी दिल्ली
कॉम्प्युटर, लॅपटॉपची निर्मिती करणाऱया लेनोव्हा कंपनीने भारतात टॅबलेटस् निर्मिती करण्याचे ठरवले आहे. त्याचप्रमाणे लॅपटॉप निर्मितीची क्षमताही आगामी काळात 10 पट वाढवण्याची योजना कंपनीची आहे. लेनोव्हा इंडियाचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक राहुल अग्रवाल यांनी सांगितलं की, कंपनी चालू आर्थिक वर्षात 25 ते 30 टक्के विकास साधू शकते. शिक्षण क्षेत्रासह मोठय़ा कंपन्यांकडून टॅबलेटस्ची मागणी नोंदवली गेली आहे. 8 इंचि टॅबलेटस्ची मागणी अधिक असून या अंतर्गत लेनोव्हा एम 8 टॅबलेटची निर्मिती भारतात केली जाणार असल्याचे ते म्हणाले.