चापगाव/वार्ताहर
खानापूर तालुक्मयातील शिवोली गावचे सुपुत्र व बेळगाव मराठा लाईट इन्dफंट्रीच्यी 26 कर्नाटका बटालियनच्या एनसीसामध्ये कार्यरत असलेले चांगाप्पा विष्णू पाटील यांना 15 ऑगस्ट रोजी लेफ्टनंटपदी बढती मिळाल्याबद्दल गणेशोत्सवाचे औचित्य साधून शिवोली ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
बेळगाव येथे जाधवनगर मध्ये असलेल्या मराठा लाईट इन्फंट्रीच्या बेलगाम मराठा सेंटरच्या नॅशनल कॅडेट कोर (एनसीसी) 26 बटालियन मध्ये ते गेली दोन वर्षे सुभेदार मेजर म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याची मराठा लाईट इन्dफंट्रीने दखल त्यांची लेफ्टनंटपदी बढती केली आहे. बेळगाव जिह्यात एनसीसी 26 कर्नांटका बटालियन मधून लेफ्टनंटपदी बढती मिळालेले ते एकमेव ठरले आहेत.