प्रतिनिधी /बेळगाव
सदर्न कमांडचे आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल जे. एस. नैन यांनी मराठा लाईट इन्फंट्रीला सोमवारी भेट दिली. जुनिअर लिडर्स विंगच्या कमांडन्टनी त्यांचे स्वागत केले. यावेळी नैन यांना इन्फंट्रीमध्ये दिले जाणारे आधुनिक प्रशिक्षण आणि विविध उपक्रम यांची माहिती देण्यात आली. या शिवाय इंडो-जपान अंतर्गत सुरू असलेल्या धर्मा गार्डीयनबद्दलही माहिती देण्यात आली.
यानंतर लेफ्टनंट जनरल नैन यांनी मराठा लाईट इन्फंट्री व ज्युनिअर लीडर विंग्सच्या कामकाजाची माहिती घेतली व येथील प्रशिक्षण, कामकाज, शिस्त याबद्दल प्रशंसा व्यक्त केली.