वृत्तसंस्था/ लेयॉन
ग्रीकच्या द्वितीय मानांकित स्टिफॅनोस सित्सिपसने रविवारी येथे एटीपी टूरवरील लेयॉन खुल्या आंतरराष्ट्रीय पुरूषांच्या क्ले कोर्ट टेनिस स्पर्धेत एकेरीचे जेतेपद मिळविताना ब्रिटनच्या नुरीचा पराभव केला.
रविवारी झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात सित्सिपसने नुरीचा 70 मिनिटांच्या कालावधीत 6-3, 6-3 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अजिंक्यपद पटकाविले. या संपूर्ण स्पर्धेत सित्सिपसने केवळ एक सेट गमविला आहे. एटीपी टूरवरील सित्सिपसचे हे सातवे जेतेपद आहे. सित्सिपसने गेल्या महिन्यात माँटे कार्लो मास्टर्स टेनिस स्पर्धा जिंकली होती. पुरूष टेनिसपटूंच्या मानांकन यादीत सित्सिपस सध्या पाचव्या स्थानावर आहे. 30 जूनपासून प्रेंच ग्रॅण्ड सॅलम स्पर्धा पॅरीसमध्ये खेळविली जाणार आहे.