हल्ली बदललेल्या खानपानाच्या सवयी आणि जीवनशैलीतील घातक बदल यांमुळे मूळव्याधीची समस्या सर्रास दिसू लागली आहे.
- मूळव्याधीवर लेसर सर्जरीचा उपाय प्रभावी ठरतो. ही अन्य सर्जरीप्रमाणेच आहे. या मदतीने टिश्यूला कापून कोणत्याही आजारावर उपचार केला जातो.
- पारंपारिक सर्जरीच्या तुलनेत लेसर सर्जरी सर्वोत्तम मानली जाते. कारण लेसरमुळे रुग्णांला कमीत कमी त्रास होतो आणि रक्तस्राव फारसा होत नाही.
- यात संसर्ग,जखमा होण्याचे प्रमाण शून्यच राहते. लेसर सर्जरीनंतर रुग्ण लवकर बरा होतो.
- लेसर सर्जरी करण्यापूर्वी डॉक्टर रुग्णाची पडताळणी करतात आणि त्याआधारे मूळव्याधीचे स्वरुप जाणून घेतले जाते. उपचारादरम्यान रक्ताचे नमुने घेतले जातात. त्यानुसार डिजिटल उपकरणाच्या मदतीने चाचणी कली जाते.
- बाहेरील मूळव्याध हा ऍनसच्या बाहेर असतो. त्यामुळे त्याचे निदान लवकर करणे सोपे जाते. तपासणीनंतर रुग्णाचे ऑपरेशन केले जाते. तत्पूर्वी रुग्णाला लोकल ऍनेस्थेशिया दिला जातो.
- ऍनसच्या आसपासचा भाग बधीर केला जातो आणि लेसर सर्जरी केले जाते. ही सर्जरी 20 ते 30 मिनिटात होते आणि यात रुग्णाला टाके पडत नाहीत, जखमा होत नाहीत.
- लेसर सर्जरीनंतर रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही आणि रक्तस्राव देखील होत नाही.
- ऑपरेशनच्या दिवशीच रुग्णाला घरी सोडले जाते. पुढील दोन दिवसात रुग्ण ठणठणीत होतो आणि तो नियमितपणे कामावर जावू शकतो.
– डॉ. महेश बरामदे