ऑनलाईन टीम / लेह :
लेहमध्ये आज भूकंपाचे धक्के जाणवले. शुक्रवारी दुपारी 4.27 मिनिटांनी हा भूकंप झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, भूकंपाची तीव्रता 5.4 रिश्टल स्केल एवढी होती. या भूकंपाचे धक्के जवळपास 10 सेकंदापर्यंत जाणवत होते. मात्र, या भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही आहे. लोकांना भूकंपाची जाणीव होताच लोक घरातून बाहेर पडले.