अभाविपचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
हारुगेरी येथे एका मुलीची छेड काढून तिचा खून करण्यात आला. कॅम्प येथेही अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आले. नियाज हॉटेलचालकांनी संतांचा अवमान केला. अशा घटना वारंवार घडत आहेत. तेंव्हा त्याचा गांभीर्याने विचार करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने जिल्हाधिकाऱयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार सुरूच आहेत. याचबरोबर समाज कंटकांकडून सामाजिक शांतता बिघडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. हारुगेरी येथे एका मुलीची छेड काढून तिचा खून करण्यात आला. ही बाब अत्यंत गंभीर आहे. त्यांना कठोर शिक्षाही झालीच पाहिजे. याचबरोबर अशा घटना घडू नये यासाठी पाऊल उचलणे गरजेचे असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अभाविपचे ईश्वर मुनवळ्ळी, गुरुलिंग हिरेमठ, विनोद घोटाटगी, जोशेष, अश्विन उमनाबादीमठ यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.