प्रतिनिधी/ पणजी
एका 70 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार करून पसार झालेल्या संशयिताला आगशी पोलिसांनी केपे येथील एका जंगलात अटक केली आहे. लैंगिक अत्याचाराची घटना 21 नोव्हेंबर रोजी घाडली होती. पोलिसांनी संशयिता विरोधात भादंसं 376 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार अटक केलेल्या संशयिताचे नाव अनिल पास्कॉल तिग्गा (34) असे आहे. संशयित मुळ छत्तीसगड येथील असून गेल्या काही वर्षापासून तो गोव्यात राहत होता.
लैंगिक अत्यचाराची घटना 21 नोव्हेंबर रोजी घडली होती. जमीन विकत घेण्यास इच्छूक असलेल्या 70 वर्षीय महिलेला जमीन दाखवण्यासाठी नेवरा येथील एका जंगलात नेले व तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार केले होते. महिला एकटीच असल्याने तिच्यासोबत झालेल्या घटनेने ती घाबरून गेली होती. घटना 21 नोव्हेंबर रेजी घडली असतानाही तिने तक्रार दाखल केली नव्हती अखेर पीडित महिलेने रविवारी तक्रार दाखल केली असता आगशी पोलिसांनी संशयिताला अवघ्या काही तासातच अटक केली आहे. आगशी पोलीस पुढील तपास करीत आहेत.