मालवण/प्रतिनिधी-
तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून वारंवार धमकी देऊन अत्याचार केल्या प्रकरणी मालवण पोलिसांनी अटक करून जिल्हा विशेष न्यायलायत हजर केलेला संशयित आरोपी एकनाथ राजाराम साळगावकर याला न्यायालयाने सोमवार २६ जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशी माहिती मालवण पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर यांनी दिली आहे.
पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीवरून संशयीत तरुणा विरोधात मालवण पोलीस ठाण्यात पोक्सो व अन्य कलमान्वये मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला मालवण पोलिसांनी रात्री अटक केली होती. आता त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.
एकूणच या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ओटवणेकर यांनी दिली आहे.