खानापूर / बातमीदार
महालक्ष्मी ग्रुप संचलित लैला शुगर प्रा. लिमिटेड खानापूर यांच्यावतीने 2020 -21 सालातील गळीत हंगामातील पहिली उचल म्हणून 2500 रुपये पहिला हप्ता देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच एफ. आर. पी. प्रमाणे तोडणी आणि वाहतूक वजा करता राहिलेली रक्कम जास्तीत जास्त शेतकऱयांना मिळेल अशा पद्धतीने कारखाना प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विठ्ठल हलगेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
या वषी ज्या शेतकऱयांनी या कारखान्याला ऊस पाठवलेला आहे. त्या ऊस उत्पादक शेतकऱयांचे 15 नोव्हेंबरपर्यंतचे बिल त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. आपल्या कारखाना क्षेत्रातील ऊस जास्त प्रमाणात या कारखान्याला पाठवला तर वाहतूक दर कमी होऊन शेतकऱयांच्या उसाला जास्तीत जास्त भाव देता येणार आहे. तसेच शेतकऱयांनी कोणतीही घाई गडबड न करता अन्य कारखान्याला ऊस न पाठवता या कारखान्याला जर ऊस पाठवला तर शेतकऱयांना चांगला भाव द्यायला कारखान्याला सोयीचे होणार आहे.
‘लैला शुगर्स’लाच ऊस पाठवावा
त्यासाठी खानापूर तालुक्मयातील सर्व शेतकऱयांनी ‘लैला शुगर्स’लाच आपला ऊस पाठवावा व जास्तीत जास्त दर मिळवून घ्यावा, असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाच्यावतीने कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सदानंद पाटील यांनी केले आहे.
यावेळी कारखान्याचे चेअरमन विठ्ठल हलगेकर, संचालक चांगापा निलजकर, विठ्ठल करंबळकर, बाळगौडा पाटील, यल्लाप्पा तिरवीर, पुंडलिक गुरव, सुरेश कोलकार, परशराम खांबले, कारखान्याचे मॅनेजिंग डायरेक्टर सदानंद पाटील, महालक्ष्मी सोसायटीचे जनरल मॅनेजर तुकाराम हुंदरे व सर्व संचालक उपस्थित होते.
…तर कारखाना प्रशासनाला सुलभ होणार
कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱयांनी जर आपल्या कारखान्याला ऊस पाठवला तर उसाचे जास्तीत जास्त गाळप झाल्याने कारखानासुद्धा नफ्यात येणार आहे. व शेतकऱयांनाही नफा होणार आहे. तसेच या माध्यमांतून कारखान्याचा विस्तार डिस्टिलरी लवकरात लवकर झाली तर याद्वारे अनेकांच्या हाताला काम मिळणार आहे. तसेच शेतकऱयांना सुद्धा जास्तीत जास्त दर द्यायला कारखाना प्रशासनाला सुलभ होणार आहे असेही यावेळी सांगण्यात आले.
जादा उत्पन्न देणाऱया उसाचे पीक घ्या
केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अनुदानामुळे आगामी काळात शेतकऱयांना चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱयांनी आपल्या शेतात अधिक पैसा मिळवून देणाऱया ऊस पिकाचे उत्पादन घ्यावे असेही यावेळी सांगण्यात आले.