खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर खानापूर कारखान्याचे बॉयलर पूजन : रयत मेळाव्याला उपस्थित राहण्याचे शेतकऱयांना आवाहन
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुप संचलित महालक्ष्मी (लैला शुगर) साखर कारखान्याचा 2022-23 या गळीत हंगामाला येत्या 11 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. या अनुषंगाने खंडेनवमीच्या शुभ मुहूर्तावर मंगळवारी बॉयलर प्रदीपन सोहळा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात परमपूज्य श्री चन्नबसव देवरु मठाधीश यांच्या दिव्य सानिध्यात महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर व सौ. रुक्मिणी हलगेकर यांच्या यजमान पदाखाली होमहवन व पूजा पार पडली. त्यानंतर बॉयलरला अग्नी देऊन पूजन केले.
यावेळी खानापूर तालुका भाजपा अध्यक्ष संजय कुबल, कुप्पटगिरी, दोड्डहोसूर येथील पंचमंडळी त्याचप्रमाणे परिसरातील अनेक शेतकरी व महालक्ष्मी ग्रुपचे संचालक मंडळ व कर्मचारी उपस्थित होते. स्वागत कारखान्याचे महाव्यवस्थापक सदानंद पाटील यांनी केले.
11 रोजी गळीत हंगाम-शेतकरी मेळावा
यावेळी बोलताना तोपिनकट्टी महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल हलगेकर म्हणाले, महालक्ष्मी ग्रुपने लैला साखर कारखान्याला भाडेतत्त्वावर घेऊन यावषीचा हा दुसरा गळीत हंगाम सुरू करत आहोत. या अनुषंगाने येत्या 11 ऑक्टोबर रोजी या 2022-23 सालातील गळीत हंगामाला प्रारंभ होणार आहे. या निमित्ताने कारखाना कार्यस्थळावर खानापूर तालुक्मयातील शेतकऱयांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला मार्गदर्शन करण्यासाठी कर्नाटक राज्य रयत मोर्चाचे अध्यक्ष व खासदार इराण्णा कडाडीसह मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी तालुक्मयातील समस्त शेतकऱयांनी या रयत महामेळाव्याला उपस्थित रहावे, असे आवाहन त्यांनी केले.
स्व. नीळकंठराव सरदेसाई यांचा 11 रोजी पुतळा भूमिपूजन
शेतकऱयांच्या हितासाठी स्वर्गीय आमदार नीळकंठराव सरदेसाई यांनी कारखान्याची उभारणी केली. त्यांचे नाव कारखाना स्थळावर कायम करावे यासाठी महालक्ष्मी ग्रुप संचालक मंडळाने स्व. आमदार नीळकंठराव सरदेसाई यांचा पुतळा उभारणीचा निर्णय घेतला असून सदर पुतळा उभारणीच्या भूमिपूजन कार्यक्रम देखील दि 11 ऑक्टोबर रोजी आयोजित केला असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावरुन पूज्य श्री चन्नबसव देवरु, भाजपा अध्यक्ष संजय कुबल यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी दोन्ही गावच्या पंच कमिटीचा व उपस्थितांचा सन्मान करण्यात आला. कारखान्याचे शेतकी विभागाचे अधिकारी बाळासाहेब शेलार यानी आभार मानले.