अभिनेत्री अदा शर्माच्या अनेक चित्रपटांचे चित्रिकरण कोरोना संकटामुळे थांबले आहे. अनेकांप्रमाणे तिलाही योग्य स्थितीची प्रतीक्षा आहे. लॉकडाउनमध्ये मी नेक नव्या गोष्टी शिकले आहे. आम्ही सर्वच अत्यंत वाईट काळातून जात आहोत. सोशल मीडियावरही प्रचंड नकारात्मकता आहे. अशा स्थितीत स्वतःला प्रोत्साहित ठेवणे अत्यंत आवश्यक असल्याचे अदाने म्हटले आहे.
ट्रोलिंगमुळे एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर प्रतिकूल प्रभाव पडू शकतो हे ट्रोलर्सना समजून घ्यावे लागेल. सर्वजण अत्यंत वाईट काळातून जात असल्याने परस्परांना धीर देण्याची गरज आहे. माझी आई माझ्यासोबत राहत असल्याने लॉकडाउनमध्ये एकटेपणा वाटला नाही. इतरांच्या तक्रारींशी मी स्वतःची तुलना करू शकत नाही. लोकांना माझ्याहून अधिक तीव्रतेच्या समस्या असल्याचे ती सांगते.
अभिनेत्री म्हणून मला लवकरात लवकर चित्रिकरण सुरू करायचे आहे. या महामारीने मला बरेच काही शिकविले आहे. आता मी स्वतःपेक्षा माझ्याभोवताली असलेल्या लोकांसाठी काही करू इच्छिते. शारीरिकदृष्टय़ा फिट राहणे मला आवडते. लॉकडाउनच्या काळात बासरीवादन शिकल्याचे अदाने म्हटले आहे.