बागायतदार बाजारात लोकांच्या रांगा. बाजारात खरेदीसाठी झुंबड. बाजार असल्याने भाजी खरेदीस गर्दी.
डिचोली/प्रतिनिधी
राज्य सरकारकडून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दुपारी राज्यात गुरुवारी (दि. 29 एप्रिल) रात्रीपासून लॉकडाऊन जाहिर केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी डिचोली बाजारात लोकांची अक्षरशः जत्राच पहायला मिळाली. डिचोली शहरातील बागायतदार बाजार तसेच इतरही सुपर मार्केटमध्ये लोकांची खरेदीसाठी गर्दी झाली होती. बाजारातील आणि शहरातील अनेक किराणा माल दुकानांवर लोकांची झुंबडच होती. तर डिचोलीचा साप्ताहिक बाजार असल्याने लोकांनी.पुढील चार दिवसांसाठी आवश्यक असलेला भाजीचा साठा खरेदी केला.
गुरूवारी रात्री ते सोमवारी सकाळीपर्यंत लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. मात्र या केवळ चार दिवसांच्या लॉकडाऊनसाठी लोकांची मोठी धावपळ पहायला मिळाली. जसे सदर लॉकडाऊन महिनाभरासाठी आहे, याच विचाराने लोकांनी बाजारातून सामान खरेदी केलेले आहे. संध्याकाळी तर किराणा दुकानांच्या बाहेर लोकांची अक्षरशः झुंबडच दिसून येत होती. प्रत्येकजण आपल्या सामानाच्या याद्या घेऊन येत होते. आणि मोठमोठय़ा पिशव्या भरून सामान घेऊन जात होते. या गों?धळात मात्र सर्वचजण सामाजिक सुरक्षा अंतराचा नियम विसरलेले दिसत होते.
बागायतदार बाजाराच्या बाहेर तर लोकांनी रांगा लावल्या होत्या. अस्थापनामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोकांची गर्दी झाल्यानंतर अतिरिक्त लोकांना बाहेर ठेवले जाते. काल दुपारनंतर बागायतदार बाजारात लोकांची गर्दीच असल्याने मागाहून येणाऱया लोकांना बाहेर रांगेत उभे करण्यात आले होते. बागायतदार बाजाराप्रमाणे डिचोलीत कार्यरत असलेल्या इतरही लहान मोठय़ा सुपय मार्केटमध्येही लोकांनी गर्दी केली होती. सामान खरेदीची झुंबड आणि गोधळ पाहता हे लॉकडाऊन एक महिन्याचे असल्याचा भास होत होता.
बुधवार हा डिचोलीचा साप्ताहिक बाजार असल्याने लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर डिचोली बाजारात भाजी खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. सकाळपासून 50 टक्केच भरेला बाजार नियमितपणे चालू होता. मात्र लॉकडाऊच्या घोषणेनंतर बाजारात भाजी खरेदीसाठी लोकांनी गर्दी केली होती. त्यामुळे सामाजिक सुरक्षा अंतराचा फज्जाच उडल्याचे दिसून येत होते.
अनेकांनी पुढील चार दिवसांसाठी (रविवारपर्यंत) आवश्यक असलेल्या मासळीचाही साठा करण्यासाठी मासळी बाजारात गर्दी केली होती. डिचोलीचा बुधवार साप्ताहिक बाजार असल्याने अनेकांधी सुकी मासळीही मोठय़ा प्रमाणात खरेदी केली. या सर्व गोष्टींबरोबरच डिचोली शहरातील घाऊक मद्य विक्री केंद्रांवरही मद्यप्रेमींची साठा करून घेण्यासाठी झुंबड सोती. काही विक्री केंद्रांवर तर समाजिक सुरक्षा अंतर सांभाळत मद्यप्रेमींनी रांगा लावल्या होत्या.
लॉकडाऊनचे चार दिवस घरात आरामात काढायचे. कोणत्याही सामानासाठी लॉकडाऊन काळात घराबाहेर पडायचे नाही. अशीच अनेकांनी धारण केली आहे. व्हायरसचा धोका असल्याने संसर्गाची हि साखळी तोडण्यासाठी घराबाहेर न पडता विश्रांती घ्यावी. असे अनेकांनी ठरविले आहे. त्यासाठी सामान खरेदीसाठी कालच बाजारात गर्दी केली होती. मात्र या समान खरेदीच्या गोंधळात सर्वात आवश्यक असलेला सामाजिक सुरक्षा अंतराचा नियम अनेकजण विसरले होते. काहींनी तर मास्क नाकाच्या खाली ठेऊन बाजारात आपला वावर केला. बाजारात बुधवारीच झालेली गर्दी पाहता कोरोनाचे रूग्ण या लॉकडाऊननंतर घटण्यापेक्षा वाढण्याचीच जास्त शक्मयता निर्माण झाली आहे.