मिरकरवाडा ट्रॉलिंग लॉंचमालक, मच्छीमार असोसिएशनची कारवाईची मागणी
प्रतिनिधी / रत्नागिरी
नजीनच्या मिरकरवाडा व साखरीनाटे या बंदरातून 100हून अधिक पर्ससीन नौका तसेच प्रत्येकी नौकेवर 30 ते 35 खलाशी कोणतेही सोशल डिस्टस्निंग न पाळता मासेमारीसाठी गेले होते. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे अनधिकृत पर्ससीन मासेमारी बंद करुन संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी मिरकरवाडा ट्रालिंग लॉंचमालक, मच्छीमार असोसिएशनने सहाय्यक मत्स्य आयुक्तांकडे केली आह़े
राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू आह़े संपूर्ण देशभरामध्ये लाकडाऊन असतानाही काही अनधिकृत बंदी कालावधीमध्ये 100 हून अधिक पर्ससीन नौका 17 एप्रिल रोजी मासेमारी करण्यासाठी समुद्रामध्ये गेल्या होत्य़ा मात्र स्वत:च्या स्वार्थासाठी बेकायदेशीर कृती करणाऱया नौकांचे मालक, तांडेल, पागी व सर्व खलाशी यांच्याविरुद्ध मत्स्य विभागाने रत्नागिरी व साखरी नाटे येथील सागरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करावी, अशी मागणी मिरकरवाडा ट्रालिंग लाँचमालक, मच्छीमार असोसिएशनने केली आह़े लॉकडाऊनमधील सर्व नियम तोडल्यामुळे एखाद्यास कोरोनाची लागण झाल्यास मत्स्य विभाग जबाबदार राहणार आह़े तसेच अनधिकृत पर्ससीन मासेमारी बंद करुन त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी मिरकरवाडा ट्रालिंग लॉंचमालक, मच्छीमार असोसिएशनने मत्स्य विभागाकडे केली आह़े