प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमध्येसुध्दा रेल्वेची मालवाहतूक सेवा सुरू आहे. अर्थातच माल उतरविण्यासाठी आणि चढविण्यासाठी रेल्वेचे काही मजूर व हमाल कार्यरत आहेत. या सर्वांची नोंद घेवून दक्षिण मध्य रेल्वेने अधिकारी संघटनेतर्फे या मजूर आणि हमालांना जीवनावश्यक वस्तूंचा संच देण्यात आला.
देसूर येथे अशा 100 जणांना हे संच देण्यात आले. ज्यामध्ये पाच किलो तांदुळ, 2 किलो गहू, 1 लीटर खाद्य तेल, मीठ, तुरडाळ, हळद, तिखट, जिरे आंघोळीचे आणि कपडे धुण्याचे साबण इतके साहित्य आहे. साऊथ वेस्टन अधिकारी संघटनेच्या सदस्यांनी यासाठी निधी देवू केला आहे. एका कुटुंबाला किमान 10 दिवस पुरेल इतके हे साहित्य आहे. रेल्वेचे सहाय्यक विभागीय अभियंता हिसामुद्दीन, प्रमुख जे. पी. सामाल यांनी हे साहित्य वितरित केले आहे. असेच साहित्य गदग आणि बागलकोट येथे वितरित करण्यात आले व बळ्ळारी येथेही वितरित करण्यात येणार आहे.