अभिनेता आनंद काळे, मिलिंद अष्टेकर, रणजित जाधव यांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर चित्रनगरीत कोरोनाच्या नियमांचे पालन करीत मोजक्या कलाकारांच्या उपस्थितीत चित्रिकरण सुरू आहे. प्रत्येक कलाकार, तंत्रज्ञ, कॅमेरामन यांची वारंवार तपासण्या केल्या जात आहेत. शहराबाहेर मोकळÎा जागेत मालिकांचे चित्रिकरण सुरू आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्येही नियमांच्या अधिन राहून चित्रिकरणाला परवानगी द्या, या मागणीचे निवेदन अभिनेता आनंद काळे, चित्रपट महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलींद अष्टेकर, माजी कार्यवाह रणजीत जाधव यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना दिले.
निवेदनात म्हटले आहे, गेल्या वर्षभरात मनोरंजन क्षेत्राची विस्कटलेली घडी सुरळीत करण्यात कोल्हापूरचे मोठे योगदान आहे. लॉकडाऊनमुळे चित्रिकरण थांबल्यास मनोरंजन क्षेत्राला खिळ बसेल. चित्रिकरणास येणारे सर्व कलाकार, तंत्रज्ञ सॅनिटायझर, मास्क, हॅन्डग्लोज घालतील. तसेच वारंवार स्वॅब तपासणीही करतील, तरी जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनच्या काळातही नियमांच्या आधीन राहून चित्रिकरणास परवानगी द्यावी. यावर शासनच्या गाईडलाईन येतील त्यानुसार निर्णय घेणार असल्याचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी त्यांना सांगितले.
चित्रिकरणासंदर्भात पालकमंत्रीची भेट घेणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभर लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे सांस्कृतिक क्षेत्राचे भरपूर नुसान झाले आहे. आता कोठे कोल्हापुरात मालिकांच्या चित्रिकरणाला सुरूवात झाली आहे. तोपर्यंत बंद करणे निर्मार्ते, दिग्दर्शक, कलाकार कोणालाच परवडणारे नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्येही चित्रिकरणाला परवानगी द्या या मागणीसाठी पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेणार.-मिलिंद अष्टेकर (लाईन प्रोडÎूसर)