प्रतिनिधी / पुलाची शिरोली
लॉकडाउनचा गैरफायदा घेत शेतकर्यांची लूट करणार्या पुलाची शिरोली परिसरातील दोन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द होणार ? दैनिक ‘ तरुण भारतच्या’ वृत्ताची दखल घेऊन जिल्हा कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम जिल्हा कृषी व हातकणंगले तालुका अधिकारी सतिश भोसले यांनी शिरोली कृषी सेवा केंद्राना अचानक भेटी देऊन कारवाई केली. येथील तन्मय कृषी केंद्र व परमाज फर्टिलायझर या दोन कृषी सेवा केंद्रावर गैरव्यवहार आढळून आला. यामध्ये एका दुकानात चढ्या भावाने कृषी औषधे, खते व बी बियाणे विक्री करत असल्याचे निदर्शनास आले. तसेच मुदतबाह्य औषधांचीही विक्री सुरू असल्याचे निदर्शनास आले.
तन्मय कृषी केंद्र यांचा आरसीएफ कंपनीच्या सुफला खत साठा 10.50 मेट्रिक टन व आरसीएफ सेंद्रिय खत एकूण 1.50 मेट्रिक टन अशा एकूण 12.00 मे.टन खत साठ्यास विक्री बंद आदेश देण्यात आले. याची किंमत 2 लाख 27 हजार 310 रुपये होते. तसेच परमाज फर्टिलायझर कडील आयसीएस कंपनीकडील एकूण 6.8 मेट्रिक टन त साठ्यास विक्री बंद आदेश देण्यात आले. त्याची किंमत 1 लाख 24 हजार रुपये होते.
ही कारवाई जिल्हा परिषद कोल्हापूर कृषी विकास अधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश देशमुख यांनी केली. सदर प्रस्ताव कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयास सादर करणेत येणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले.
लॉकडाउनचा गैरफायदा घेत शेतकर्यांची लूट करणाऱ्या पुलाची शिरोली परिसरातील दोन कृषी सेवा केंद्राचे परवाने रद्द होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली. दैनिक तरुण भारतच्या वृत्ताची दखल घेऊन जिल्हा कृषी अधिकारी सतिश भोसले यांनी शिरोली येथील दोन कृषी सेवा केंद्राना अचानक भेटी देऊन कारवाई केली.