प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊनमध्ये अनेक जणांनी विविध उपक्रम राबविले. महत्त्वाचे म्हणजे मुलांचा वेळ कसा घालवायचा? हा मोठा प्रश्न होता. यावर रॉय रोडवरील श्री होम्स अपार्टमेंटच्या रहिवासी संघटनेने सर्वांना एकत्र घेऊन दोन महिने विविध स्वरुपाचे प्रशिक्षण मुलांना आणि स्त्राr-पुरुषांनाही दिले. विशेष म्हणजे या उपक्रमाची सांगतासुद्धा खास समारंभ आयोजित करून झाली.
रहिवाशांपैकी लता, अनुषा, पौर्णिमा, आकांक्षा, हेमा या महिलांनी अपार्टमेंटमधील मुले, महिला आणि पुरुषांसाठी स्वयंपाक, वेशभूषा, नृत्य, चित्रकला, संगणक यासह अनेक प्रकारचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे सर्वांचाच वेळ सत्कारणी लागला. मुलांचा अभ्याससुद्धा घेण्यात आला.
सांगता समारंभात ज्ये÷ रहिवासी गंगे यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. मुलांनी विविध राज्यांच्या वेशभूषा सादर केल्या. त्यामध्ये प्रामुख्याने भारती, हेमा, आशा, राजलक्ष्मी, मंजिरी, प्रीती यांनी बक्षिसे मिळविली. लक्ष्मी गंगे आणि नीता कदम यांनी ध्वजसंचलन केले. आराध्या, पुष्पा, नव्या व पियुष यांनी चित्रकला स्पर्धेत तर पाककला स्पर्धेत गंगे, कुमार, नागराज, प्रकाश, शेट्टी यांनी यश मिळविले. नृत्य स्पर्धेत आरोही हिने बक्षीस मिळविले.