ऑनलाईन टीम / मुंबई :
जगभरात थैमान घालत असलेला कोरोना व्हायरस महाराष्ट्रात देखील मोठय़ा प्रमाणात फैलावत आहे. त्यामुळे अनेकांनी घरात बसण्याचा पर्याय स्विकारला आहे. दरम्यान, दबंग खान देखील सध्या कोरोना व्हायरसमुळे घरात आहे. त्याने आपल्या आगामी चित्रपटांचे चित्रीकरण थांबवले आहे. या मिळालेल्या वेळेचा उपयोग सलमानने पेंटिंग करण्यासाठी केला आहे. स्वतः सलमानने सोशल मीडियावर पेंटिंग करतानाचा व्हिडिओ शेअर केला.
या व्हिडीओ मध्ये सलमान खान कोळश्याने पेंटिंग करताना दिसत आहे. अवघ्या दोन मिनिटांमध्ये सलमानने पेंटिंग पूर्ण केलं आहे. यात सलमानने एका आईचं आणि मुलीचं पेंटिंग केलं आहे. सध्या सोशल मीडियावर हा व्हिडिओ मोठय़ा प्रमाणात व्हायरल होत आहे.