खानापूरात फिरत्या व्यावसायिकांवर बेकारीची कुऱहाड
प्रतिनिधी/ बेळगाव
खानापूर शहर आणि तालुक्यात काही व्यावसायिकांनी स्पॅप खरेदी करून ते मोठय़ा व्यापाऱयांना विकण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. स्पॅप मालाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असला तरी या व्यवसायावर शेकडो नागरिकांचा उदरनिर्वाह चालत असतो. मिळेल त्या ठिकाणी स्पॅप गोळा करून मोठय़ा बाजारात विक्री करणारे आणि औद्योगिक क्षेत्रातील स्क्रॅप गोळा करणारे असे वेगवेगळे व्यावसायिक आहेत. कोरोनामुळे हा व्यवसाय सध्या बंद असून स्क्रॅप व्यवसायातील अनेकांवर बेकारीची कुऱहाड कोसळली आहे. वर्षभरात दोन वेळा हा धंदा बंद झाल्याने शेकडो जणांना झळ बसत आहे.
स्क्रॅप कामाकडे अनेकजण उदरनिर्वाहाचे साधन म्हणून पाहतात. दिवसाकाठी जमा झालेले स्क्रॅप गोळा करून त्याची मोठी उलाढाल होत असते. मिळेल त्या ठिकाणी स्क्रॅप गोळा करणारे कमी दराने माल खरेदी करतात आणि वाढीव किमतीने मोठय़ा बाजारपेठेत विक्री करतात. प्लास्टिक, खंड, पत्रा, रद्दी, पुठ्ठे आदी वस्तू भंगारात विकत घेतल्या जातात. या व्यवसायात सध्या परप्रांतीय कुटुंबे मोठय़ा प्रमाणात आहेत. हे परप्रांतीय गावागावात जाऊन हातगाडय़ा फिरवत स्पॅप जमा करतात. हे भंगार काही वस्तू देऊन खरेदी केले जाते. एक कामगार दिवसाकाठी 50 ते 100 किलो स्क्रॅप गोळा करतो. या व्यावसायिकांचे सध्या काम बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे.
औद्योगिक क्षेत्रातील स्क्रॅप गोळा करणारे सुमारे दीडशेहून अधिक व्यावसायिक आहेत. उद्यमबागसह अन्य औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांतून ते स्क्रॅप गोळा करतात. दररोज जमा झालेले स्क्रॅप कोल्हापूर, हुबळी, गोवा आदी ठिकाणी पाठविले जाते. या व्यवसायात कामगारांची गरज असल्याने अनेक मजूर या व्यवसायावर अवलंबून आहेत. गतवषी चार महिने काम बंद पडल्याने स्क्रॅप व्यावसायिकांसह कामगारांची ओढाताण झाली. उदरनिर्वाहासाठी दुसरा पर्याय नसल्याने या व्यवसायातील कामगारांवर उपासमारीची वेळ आली.
यंदाही तीच परिस्थिती दुसऱयांदा निर्माण झाली असून स्क्रॅप व्यवसायातील कामगार हतबल झाले आहेत. अन्य रोजगारही बंद असल्याने काय करावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. स्क्रॅप व्यावसायिक किंवा कामगारांना कोणत्याही शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. सध्या स्क्रॅप देणे आणि घेणे पूर्णतः बंद असल्याने घरी थांबून राहणेच भाग पडले आहे. त्यामुळे परिस्थिती पूर्वपदावर कधी येते आणि व्यवहार पूर्ववत कधी सुरू होतो, याकडे स्क्रॅप व्यावसायिकांचे लक्ष लागून आहे.