प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊन काळातील पालकत्व हे एक आव्हान आहे. मात्र, मुले पालकांचे अनुकरण करतात हे लक्षात ठेवून पालकांनी मुलांसमोर कसे वागावे याचे भान ठेवले पाहिजे. कोरोना-19 चे नियम पालकांनी अंमलात आणले तरच मुले त्याचा अवलंब करतील, असे समुपदेशक तेजस कोळेकर यांनी सांगितले.
संस्कृती एज्युकेअरचे संचालक तेजस कोळेकर हे दर महिन्याच्या दुसऱया रविवारी विविध प्रश्नांवर कार्यशाळा घेत आहेत. रविवारी ‘पालकत्वासमोरील आव्हाने’ या विषयावर कार्यशाळा झाली.
ते म्हणाले, हा वेळ व्यर्थ घालवणे उपयोगाचे नाही. मुलांनी कौशल्याधारित शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायला हवा. नीतीमूल्ये, कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास याबाबत पालकांनी त्यांना मार्गदर्शन केले पाहिजे. मानसिक स्वास्थ्य ही आज महत्त्वाची गरज आहे. त्यामुळे मुलांचे स्वास्थ्य कसे आहे, याबाबत जाणून घ्यायला पाहिजे. मोठी माणसे थोडा अवकाश आणि वेळ मागतात. लहान मुलांचीसुद्धा तीच गरज असू शकते.
आधुनिक तंत्रज्ञानामुळे मुले पालकांकडून स्मार्ट तंत्रज्ञानाची अपेक्षा करतात. त्यामुळे भावनिक बुद्धय़ांक, संभाषण कौशल्य, तंत्रज्ञानाचा वापर करून पालकांनी स्वत:ला सक्षम करायला हवे. स्क्रीनसमोर सतत असणारी मुले ही एक समस्या बनली आहे. हे टाळता येणे शक्मय नाही. परंतु मुलांच्या वेळेवर पालकांचे नियंत्रण हवे. वाचनाचे महत्त्व त्यांना पटवून दिले पाहिजे, असे ते म्हणाले.
एकेरी पालकत्व हेसुद्धा आव्हान आहे. मात्र, ते अशक्मय नाही. परिस्थितीची जाणीव मुलांना करून दिली की ती सहकार्य करतात, असे सांगून पोषक आहार, उत्तम झोप मुलांसाठी आवश्यक आहे. त्याचे नियोजन पालकांनी करावे, असे ते म्हणाले.