केवळ घर दुरुस्तीचे काम असणार सुरू, कंटेन्मेंट झोन परिसरात मात्र बंदी
प्रतिनिधी /बेळगाव
विकेंड लॉकडाऊन असू दे किंवा इतर लॉकडाऊन काळात बांधकाम क्षेत्राला मुभा देण्यात आली आहे. या क्षेत्राला आवश्यक असणारे सिमेंट, लोखंड दुकानांनाही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन परिसर सोडून इतर परिसरातील दुकानांना ही मुभा राहणार आहे. सकाळी 6 ते दुपारी 2 पर्यंत दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
या आदेशामध्ये केवळ घर दुरुस्ती करायला मुभा राहणार आहे, असे म्हटले आहे. पावसाळय़ापूर्वी अनेकांना घरे दुरुस्ती करावी लागतात. पावसाळय़ात कोणतीही मोठी हानी होवू नये या दृष्टीने सरकारने हे पाऊल उचलले आहे. याबाबत महसुल विभागाचे राज्याचे मुख्य सचिव एन. मंजुनाथा प्रसाद यांनी हा आदेश बजावला आहे.