गृहमंत्री बसवराज बोम्माईंचा इशारा
प्रतिनिधी / बेंगळूर
कोरोनाच्या तिसऱया लाटेचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी राज्यात दि. 7 जून पर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. या कालावधीत नागरिकांनी सकाळी 6 ते 10 पर्यंत सूट दिलेल्या वेळे व्यक्तिरीत घराबाहेर पडू नये आणि सरकारी नियमांचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन गृहमंत्री बसवराज्य बोम्माई यांनी केले आहे. ते आज बेंगळूर येथे पत्रकारांशी बोलत होते. लॉकडाऊन काळात विनाकारण बाहेर फिरणाऱयांच्या दुचाकी जप्त करण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत. तेक्हा लॉकडाऊन काळात विनाकारण दुचाकी घेऊन फिरणाऱयांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ग्रामीण भागात लॉकडाऊन उत्स्फूर्तपणे पाळण्यात येत असून शहरी भागात लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन होत आहे. तेव्हा नियमांचे उल्लंघन करणाऱयांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना सरकारला देण्यात आल्या असल्याचेही ते यावेळी बोलताना म्हणाले